संत थोडे थोडे थोडे थोडॆ ॥ध्रु०॥
कलिराजाचें राज्य पहा हो यतीस बसाया घोडे ।
उंट पालख्या लाल बनाती जोडे जोडे जोडे जोडे ॥१॥
तुलसी काष्टें गळ्यांत असुनी दारधनाचे ओढे ।
नेणती कांहीं पाया पडती खोडे खोडे खोडे खोडे ॥२॥
त्यास कसे हो कविरायांचे शब्द लागती गोडे ।
अपक्क जन बहु जगांत हिरवे दोडे दोडे दोडे दोडे ॥३॥