मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
प्राकृत म्हणती बाबासाहे...

रामजोशी - प्राकृत म्हणती बाबासाहे...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


प्राकृत म्हणती बाबासाहेब बाजिराव पेशव्या ।

असो परिशुभ कर्मजि लेशव्या ॥ध्रु०॥

दाता शूर गुणज्ञ दयार्णव सत्यशील त्यापरी ।

नृपोत्तम कैचा पृथ्वीवरी ।

सदैव धर्मसंमृध्दि प्रतियुगी जो खलजन संहरी ।

तोचि हा जाणा हर कीं हरी ।

अनुवंशामध्ये अवतरला परी तेज अमानुश धरी ।

पहा हो ऐका याची परी ॥

रम्य वसलि या राजऋषीची पुण्यवान ही पुरी ।

करी ती स्वर्गश्रीची सरी ।

येथे नाना भोग भोगितो जसा जनक मंदिरी ।

आपुल्या अलिप्त अभ्यंतरी ।

खंड दंड कधि घात पात जो युध्द विरुध्द न करी ।

वेगळे राहुनि दुरचे दुरी ।

देति पाद आसमुध (द्र) ज्याचे सेवक रिपुच्या शिरीं ।

जयाचे तेज सागरोदरी ।

ज्याची सत्ता धरुनि वागती लोक कलकत्तापरी ॥

फ़िरंगी कर ताडुन घे उरीं ।

आपण कोठे न हालता हे यश मनुजाचे करीं ।

कसें हो धुंडत येतें घरीं ।

यासाठी ही तनु रायाची भगवंदश भूवरीं ।

विदारुनि शोध करा अंतरीं ।

हा प्रजापालनीं दाशरथी नृप म्हणा ।

परि तोहि अयोध्या सोडुनि गेला रणा ।

निजकरे साधिलें यश मारुनि रावणा ।

हा पदींच राहुनि अरिचा मढ करि उणा ।

प्रभु मनुज नव्हे हो अवतारामध्यें गणा ।

याहुनि पुढती कविराय याच्या वर्णुनि कीर्ति नव्या ।

तोषविल नृप मुकुटांच्या रव्या ॥१॥ध्रु॥

दाता भगवदभक्त शूर हा गुणत्रये शोभला ।

धुंडिता यास मिळेना तुला ॥

मग म्या भारत पुरुष तिघे त्यामाजिं भीष्म योजिला ।

परंतु न याचे उपमे दिला ।

शूर भागवत खरा न दाता म्हणवुन म्यां वर्जिला ।

दुजा मग कर्ण मनी आणला ।

तो तरि दाता रणपंडित परी भक्तिगुणे वाळिला ।

असा तो कर्णहि परि टाकिला ।

तिसरा याच्या उपमेकरितां धर्मराज पाहिला ।

गुणद्वययुत परि वीर्ये ढिला ।

तिही गुणाने तिघे गुणे हा त्रिगुणात्मक येकला ।

मिळेना याची उपमा भला ॥

कामधेनु चिंतामणि कल्पद्रुम गण देतो फ़ला ।

खरा परि जरि आधी याचिला ।

दीनबंधु हा बाबासाहेब दैवाने वोळला ।

पाहिजे मग दया संपत्तीला ।

अचाट देणे याचे थोडे म्हणता बहु लाभला ।

जसा श्रीसांबचि उपमन्युला ।

तेज पहातां दादासाहेब याणें आराधिला ।

रविच हा तदुदरिं जन्मा अला ।

हा जगद्वंद्य आनंदवल्लीचा तुरा ।

कोणता शुभेच्छु न म्हणेल मस्तकिं धरा ।

या अवतंसाने शोभविली हे धरा ।

युक्तिने रक्षुनि जन रिपु केले चुरा ।

या सुदैवशाली नृप मसलतीचा पुरा ।

गेले यासी विशम करुनि जे त्यासी देतो शिव्या ।

तयांच्या स्त्रिया फ़िरतील नागव्या ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP