पळूं नको थांब गवळिया तूं ॥ध्रु०॥
जाते यशोदेच्या पाशी तुला बांधविते खांबाशी ।
कोठे जाशी चोरा किती लांब रे । पळूं नको थांब रे ॥१॥
असा का रे मस्तवाला बोलुनिया होशिल बाला ।
जळो तुझा मेवा नको जा बरे । पळूं नको थांब रे ॥२॥
मला वाटे आई बाला । देऊनिया जाशी बाला ।
कविराय तुला बरे । पळूं नको थांबरे गवळिया तूं ॥३॥