मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
संसार कुणाचा गड्या काय...

रामजोशी - संसार कुणाचा गड्या काय...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


संसार कुणाचा गड्या काय खटपट करशील बाई ॥ध्रु०॥

हा घोर तुटेना तुझा साधुचा कधिं संगम धरिशीरे ।

मानवा नवाजिक तनु मिळाली परि विफ़ला करसिरे ।

रांडेच्या नादीं भरुन कुणाची किती पोटे भरसीरे ।

अविचार करुनियां असा जरासा तरि लाजसि कांहीं ।

संसार कुणाचा गड्या काय खटपट करशिल बाही ॥१॥

हा भार धरुनियां शिरी प्रपंच्यामध्यें बुडशिल कैसारे

धनिकांच्या मागें पुढें फ़िरुनियां किती मिळविसि पैसा रे ।

अजुनि कळेना कसा भास हा मृगजाळिंचा जैसारे ।

या दारसुनांच्या भरिं भरुनिया सुख तुजला नाहीं ।

संसार कुणाचा गड्या काय खटपट करशिल बाही ॥२॥

तूं कोण कुणाचा नरा कुणाची नरतनु जातीरे ।

हा प्राण करुनियां पिसा वयाची किति करसिल मातीरे ।

वा काय तुला भरवसा कुणाच्या तरि नाही कांहीं हातीरे ।

कविराय करुनि घे सखा सुखाचा विधि होसिल पाही ।

संसार कुणाचा गड्या काय खटपट करशिल बाही ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP