मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
साजणी समयिं घरधणी नसत ...

रामजोशी - साजणी समयिं घरधणी नसत ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


साजणी समयिं घरधणी नसत किती उणी युक्ती छावणी

असून कुणिकडे ।

अलि वर्षा परि न मन हर्षी झाली दुरदशा कीं मदनापुढे ॥ध्रु०॥

चट उठावल्या घनघटा, पडती पटपटा बिंदु कटितटासि

बळकट धरा ।

आता पूर नद्यासी भरपूर येईल मग शूर कसा येतो घरा ।

हा पवन भयंकर भुवन सख्याविण अवन कोण करि पवन

घनाहुनि बरा ।

ही शंका मज भय कंपा देति कुणि संपादणी तरी करा ।

ही सर्द हवा घन गर्द करी उपमर्द भदनकंदर्प देत भडिमारा ।

हा कहर जातीचा बहर मदनाचि लहर येति सरसरा ।

घनघोर गर्जनी मोर तिमिर वर जोर रात बहु थोर

वाजे करकरा ।

सारे बिळांत नयन हे जळांत होता पळ पळांत जीव घाबरा ।

किती संचित हिनमति वंचित मज गडे किंचित सुख

नये दिसून

अतिसुंदर तनु कुच मंदगिरिसम कुंदरदन काय असून ।

अशि मंडित तनु केली खंडित पति कुठें बसला रुसून ।

अकलंकित कुळ मन शंकित केली तनु अंकित मन्मथ घुसून ।

मणिहार सकळ तनुभार विकळ संसार करिल कोण पार

कठिण सांकडे ।

किती चिंता करुं भगवंता मनामधि संतापुनि येतें रडें ।

साजणी समयिं घरधणी ॥१॥

हा विलास गडे दिलखुलास पसरुनि फ़ुलास पतिसम तुला

सहित कधीं घडेल ।

असा काम मनांत जरी राम न घडविल ठाव कसा न सखि उडेल ।

सडिसाट नयन किती वाट पाहति घनदाट अजुनि तरि हाट

धरुनि शिग चढेल ।

ही रति कफ़ालत सरती त्याचि मज वरतीच संगत पडेल ।

नाहिं तोक उदरिं, किती शोक करिती जन लोक कुणिगे तरी रडेल ।

मला पाय पतीचे सदुपाय गडेग त्याचे काय मजविणें अडेल ।

घरीं दीर सासुची किरकिर मजसि नसें धीर कधीं तरि वीर

पलंगी चढेल ।

मग भाळपदीं रतिकाळ नाहिं तर ताळ नघडे कसा पडेल ।

माझि उंबर किती गडे कंबर बसली सदंबर नको म्हणे कुडी ।

मेला शंबररिपु मनिं तंबर मजवरि शंभर शर हे सोडी ।

माझी बंडाळ कुठें घेउं धुंडाळ कसीरे चांडाळ दिधलीस बुडी ।

असें कंजनयन याला अंजन नाहीं मम रंजन कोण परवडी ।

मन उदास कुणि पतिपदास धुंडिल सुदास पण जासुदास देईन कडी ।

आलो दुधार मन गडे सुधार मग सुख उधार दु:ख रोकडें ॥२॥

साजणी सम मी कांही दोष म्हणुनि पतिरोष करिन संतोष

ह्याणें माझा हर्ष सकळ उडविला ।

कोण रांड मिळाली खटभांड तिणेच माझी सांड कराया पढविला ।

किती नवस करुनि बसूं हिंवस व्यर्थ गेले दिवस कुणिग अडविला ।

कोण सवत केली भुत भक्त तेणें मन कुवत ह्रदयीं जडियेला ।

माझी दशा करुनि अशी खुशाल कुणितरि उभा असेल ।

सारि निशा कैफ़ चढविला ।

किति लवत होतें मुख गवत धरुनि सवत मिळाली तिणें दडविला ।

असा तर्क करिते परी अर्क सरस तो गर्क कर्कश शब्द

बोलुनि चिडविला ।

कुडकुडीत चित्त धडधडीत देह कडकडीत जणू ग कढविला ।

मणिकुंडल देतें भुमंडल जरि कुणी धुंडल पतिसाठीं हिंडल

निश्चयी निका

उरिं खंजिर जाणो लोह जंजिर मज माणमंजर चणीं नका ।

माझी मंगळ तनु हे अमंगळ झालि मुखिं वंगळ पांढरफ़िका ।

रतिरंजित काचि सींजित मधुकर गुंजित गेले किंग फ़ुका ।

हा कांत कठिण आकांत मदन करि शांत न धरि वांकडें

साजणी समयीं ॥३॥

तिचि रती सबळ भगवती पावली होती म्हणून तिचा पती

अचानक आला ।

मग गडबड तिची मोठी लडबड गेली सारि बडबड आनंद झाला ।

होति मायबाप करित हाय हाय धरुनि त्यांचे पाय मग

महालीं गेला ।

झाली भेट बसविली पेठ सुखाची लोट भेटला तिजला ।

मग हात धरुनि महालांत मंचकीं जात अश्रु नयनांत

सागर भरला ।

म्हणे भलि केली रांगोळी नित्य आंघोळी नयनीं जळिं झाली ।

जिव कंठी उरला ।

अशि गळां पडुनि खळखळ रडली वेल्हाळा गहिवर आला ।

मग झाली पतिकर कर्षित मनिं बहु हर्षित रतिसुख दर्शित

हेतु पुरविला ।

स्थिर जंगम त्याचा सुख संगम न पवती दंग मनांत मुसमुसी ।

रतिचे वेळे झाले नयनांचल मन्मथ झुलत मानसीं ।

कुचकुंभांकित परि भंगाहुनि तिच्या रंभा किती उर्वशी ।

असे संकट हरिस कळंकट वारिल व्यंकट न स्वि भरवसी ।

कविराज काव्य सिरताज करिल कुणी आज याजहुनि साज

निवळ चोखडें ।

तरि आदर, नाहीं तरि संपर, भरावें उदर, विकुनि लाकडें ।

साजणी समयी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP