मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
करुं तरी काय गे सइबाई...

रामजोशी - करुं तरी काय गे सइबाई...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


करुं तरी काय गे सइबाई ।

सखा घरीं नाहीं गेला बाई ।

तनु तरी जशी बहरांत आंबराई ॥ध्रु०॥

कामही मारितो शर सर्सरा ।

नीरद सोडितो बाई जळधारा ।

मारुत वाहतो जेविं निखारा ।

चंदन शीतळ चंपक नाहीं । सुख कांहीं ।

इंदुहि रिपु मज जाळी अग आई ॥१॥

मालतीची वाटे विषधरमाला ।

पोळितसे माझ्या तनुला वाळा ।

वाचा नुमटे मज गोपाळा ।

सकळही भार तनूस न राही । जळो सुधराई ।

मधुरिपु करिना गे जरि शीतळाई ॥२॥

नेत्र जळानें भरलीला ।

टाकुनि वाजविं वनिं मुरलीला ।

संगे नेतसे रति पुरलीला ।

होइल काय तिलाच निधाई । हा न ते ठाई ।

किति रति गति मति नति कविरायीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP