अरे मुखसारसाते दावुनिया जाय माते ॥ध्रु०॥
घेउं नको वेड रे ।
मनुष्याची जोड रे ।
सोसेना हे काळजातें ।
आपुलिया मार हाते । अरे मुख० ॥१॥
जळो तुझा योग रे ।
आमुचा हा भोग रे ।
उध्दवा तूं सांग त्यातें ।
तोडूं नको आज नातें । अरे मुख० ॥२॥
छळिसी हें काय रे ।
होसी कविराय रे ।
दासीमुळें या जनाते ।
मोडिसी तूं का मनाते ॥ अरे मुख० ॥३॥