मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
काय म्हणून झटशिल मला ...

रामजोशी - काय म्हणून झटशिल मला ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


काय म्हणून झटशिल मला मला । अशि कोण व्याली तुला ॥

मी चन्द्रावळी तशि नव्हे रे सोड नंदाच्या मुला मुला ॥ध्रु०॥

जेव्हां जेव्हां अडविशी जिला तिला, तसे मजहि गरतिला ।

भलतिच्या भुलशी सुरतीला, किति तेज तुझ्या सुरतिला ।

नाहाक नाहाक मारला जाशिल एखादा सोशील ।

पति नाही भला भला काय म्हणून झटशिल मला मला ॥१॥

बुडविशी आमुच्या कुला कुला ही गोष्ट काय रे खला ।

चांगला दिससी रे खला सोड तुटेल माझी मेखला ।

या कर्माला तुझी (तुसी ) नाहक मी कुठे रे म्हणशिल चला चला ।

काय म्हणून झटशिल मला ॥२॥

कुणी तुला अधिकार दिला दिला हा मार्ग काय चांगला ।

तव तात कसा वागला हा छंद तुला लागला ।

सोडुन हे मज आतांच घेईन कविराय तुझी अलाबला ।

काय म्हणून झटशिल मला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP