अहो सख्या जिवलगा काय अंतर पडलें सांगा ।
मी दासी तुमची मजला मागा ॥ध्रु०॥
असो त्याणें रुजु धरली । मग सदयपणें अनुसरली ।
करिं धरुन सुहज्जन फ़ुलबाडीमधें शिरली ।
मनाचि गति पुरली सांगाया गोष्ट नाहीं उरली ।
आनंदजळें दोघांची लोचनें भरली ।
रसामधें तरतरली । कांहीं दिवस होती अंतरलीं ।
ती युवती मदनरंगात परोपरी चुरली ।
विषय तरी रतिजोगा असा विरळ एखादे जागा ।
कविराय म्हणें तें प्रेम घरोघरीं कां गा ॥१॥