मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
दाट साधुचा हाट भागवत ...

रामजोशी - दाट साधुचा हाट भागवत ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


दाट साधुचा हाट भागवत पाठ रुचिर फ़ारशी ।

अशी हे अदभूत जगीं बारशी ।

संत शांत गुणवंत पहा भगवंत नांदतो हरी ।

मिराशी जागा याची खरी ।

खुंटविली वैकुंठपेठ ही कंठितसे भूवरी ।

बारशी वेतन याची खरी ।

चार दिवस बाजार तेथीचा वार करुनि लौकरी ।

आला हो बाइल पाठीवरी ।

मला वाटतें थेट हा आला पळुनिया घरीं ।

वोढितील तेथें देणेकरी ।

हा जरा बाजरा घेऊनि आला घरीं ।

नाहीं सुपटोपली वैकुंठीं तागडी ।

श्री लपउनि मागें पांघरतो घोंगडी ।

जनु वसन-मिळेना कुसुमाची आंगडी ॥

दगाबाज हा बगा देतसे दगा मिसळ सारशी ।

आम्हाला पाहुनि बिनवारशी ॥१॥

तिथें बुडविले इथें आला तरी जिथें तिथें हा तसा ।

पहा हो खटला केला कसा ।

शर्वादिक दुर्वास गर्विला गर्वी देउनि पिसा ।

अंबऋषीस दिला भरंवसा ।

तीर्थपारणार्थ मिसे हो व्यर्थ गांजी राजसा ।

मुनेचे पोटीं सुदर्शन ठसा ॥

शाप देऊनी ताप सोसिले आपण गर्भि वसा ।

दहादा काय चांगले वसा ।

हे क्षेत्र बारशी त्या दिवसापासुनी ।

काय केले हो याणे पंकनाम नासुनी ।

जें मना येईल तें प्रभु करितो हासुनी ।

इथें काय चालतें उदंड मुख वासुनी ।

राय सुराचा काय न करी हा पाय मात्र सारसी ।

आम्हा भ्रमरासी गम्य फ़ारसी ॥२॥

तिथें बुडविले इथें आला तरी ।

बसवलिंग हा जंगम याणें संगमसुखिं लाविला ।

तयाचा सेवक हा म्हणविला ।

भक्तियोग सुविरक्त जगाला मुक्तिमार्ग दाविला ।

उत्तरेश्वरी मठ बांधुनि दिधला ।

गुरुवर्या ज्या मर्यादेनें निर्याणीं स्थापिला ।

मठावरी पुत्र योग्य जाहला ।

नाम जया जयराम सुखाचें धाम रसिक साधुला ।

करुनि हा भगवंतीं ठेविला ।

या पुरुषवरानें अमरसभा जिंकिली ।

जें धर्मतत्त्व तें यांस गवसली किली ।

किती कूप वापिका देवालयें झांकिली ।

पर उपकाराची सीमा करुनि टाकिली ।

अविरत पदनत कविरायाच्या न विसरावा रसीं ।

म्हणुनि दे सुत भैरव आरसी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP