कांही लाज यशोदेच्या पोरा रे ॥ध्रु०॥
जेव्हां भेटे तो मज तेव्हां । हाटकी दावी मेवा ।
करुं मी काय देवा रे । कांहीं लाज यशोदे० ॥१॥
केला अनर्थ काळ शेला । देउनिया एक्या गेला ।
मुलीशी द्वाड मेला रे ।
कांहीं लाज यशोदे० ॥२॥
भेटा म्हणोनि चाखी ओठा । भय नाही सोटा
न कविराय खोटा रे ।
कांहीं लाज यशोदे० ॥३॥