श्री कल्याण स्तवन - अविनाश ब्रह्म जें कां । न...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
अविनाश ब्रह्म जें कां । नाम कल्याण ज्याचें ।
विज्ञान१ बोलताती । सार सर्व शास्त्रांचे ।
न खंडे अखंडीत । ध्यान योगीवृंदाचें ।
पहातां मुहूर्त२ मूर्ती । कोड पुरे लोचनाचें ॥१॥
जय जया मोक्षपाणी । स्वामी कल्याणराजा ।
आरती वोवाळीन । विश्वंभरा विश्वबीजा ॥ध्रु०॥
अवतार ब्रह्मवौंसीम । शक्ति अद्भुत देहीं ।
मारुती स्वरूप भासे । जिंकिले हे रिपु साही ।
जितेंद्रिय ब्रह्मच्यारी । पूर्ण लक्षणें देहीं३ ।
षड्गुण ईश्वराचा४ । पार न कळे कोण्हा हि ॥२॥
धन्य हे वौंशावळी । हंस विधी वसिष्ठ योगी ।
रामचंद्र भीम पुढें । रामदास कलयुगीं ।
सद्गुरु कल्याणस्वामी । चित्सुखान्मदभोगी ।
नातुडे द्वैतभावा । शिव नि:संग संगी ॥३॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP