श्री कल्याणचे पद - स्मरण धरावे स्वयें उद्धरा...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
स्मरण धरावे स्वयें उद्धरावें । अंतरें अंतर विवरावें रे ॥धृ०॥
अंतरें शोधितां देव । मीपणें चि जालें वाव ।
देवाधिदेव । प्रगटला रे ॥१॥
जनाचें जें आर्दन । तो चि जनार्दन ।
प्रगट निशाण । राघवाचें रे ॥२॥
येकीं अनेक येक । पाहों जातां येकबेक ।
शोधावा विवेक । सज्जनाचा रे ॥३॥
रामदास्य फळा आलें । सर्व ही कल्याण जालें ।
साक्षत्व विरालें । रामपायीं रे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP