श्री कल्याण स्तवन - कल्यान हें तीन अक्षरें कल...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
कल्यान हें तीन अक्षरें कल्याणकारी ।
नाम गातां ध्यान ध्यातां सर्व जना तारी ॥ध्रु०॥
करी पावन जो दासजनातें तो पुण्यश्लोक ।
कर्ता कारि कारण सद्गुरुराज तो येक ।
कपट वेशधारि नव्हे चि सुखसाम्यक ।
करुणासागर कृपाकटाक्ष दासतारक ॥१॥
ल्याला आंगीं अनुभवलेणीं प्रभा प्रकाशल्या ।
ल्याहावया बहुत कुशळ ग्रंथ सटीका लिहिल्या ।
ल्याहाक जाणोनी रामदासवृत्ती तोषविल्या ।
ल्यावादेवी न करि विषयीं वृत्ति त्या विरल्या ॥२॥
नरोप नाम देह गेहें सर्व नीरंजन ।
नन्दन नंदन सर्व घटी भावी सज्जन ।
नम्र मानस ज्यां सम साधू दुर्जन ।
नमीं पदें ज्याचीं शिव सु व्हावया पातकभंजन ॥३॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP