मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
राजीवनयना रघुवीरा । शिवहर...

श्री रामाचे पद - राजीवनयना रघुवीरा । शिवहर...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


राजीवनयना रघुवीरा । शिवहरमानसमंदीरा ।
अरिविरमर्दन रणधीरा । अगणित तव गुण गंभीरा ॥ध्रु.॥
अगम्य न गमे हे करणी । जद मूढ पावन श्रीचरणीं ।
वौंशाभरणा तूं तरणी । नामें तरले दृमपाणी ॥१॥
हरिवर सुरवर अवतारी । गिरिवर तरुवर नळ तारी ।
दशमुखछेदन शरधारी । बंदमोचन वृत्रारी ॥२॥
मंगळ जननी ज्या माता । वाल्मिक तरला ज्या माता ।
श्रवणें तरले भव माता । कल्याणदायक गुरुभक्ता ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP