मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
श्रीमत्‍सत्यस्वरूपनित्यनि...

श्लोक स्वामीचे - श्रीमत्‍सत्यस्वरूपनित्यनि...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

श्रीमत्‍सत्यस्वरूपनित्यनिखिळानंदैकबोधोदया ।
मिथ्या दृश्य प्रपंच अभ्रपटलं न्यायें प्रकाशी दया ।
मीतूंभ्रांति हरूनि आत्मपदवी देवोनियां तारिलें ।
कल्याणद्वयमूर्ति मुद्‍गलरुपें कीर्तीसि विस्तारिलें ॥१॥

गुरुराय श्री कल्याण । नमीतो चरणा ॥ध्रु०॥
हे चि माझी विनंती । मज भक्ती घ्यावी पुरती ॥१॥
तुझें नाम मुखीं गातां । हरे भवभयचिंता ॥२॥
तुझा कृपावर ज्यासी । तो चि मान्य सकळांसी ॥३॥
तुझें ध्यान करी सदा । अनुभवी सदानंदा ॥४॥
महारुद्र नामें हरी । तो चि होसी ब्रह्मच्यारी ॥५॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP