मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
स्वामी माझा योगीराजा आवडत...

श्री गुरूंचे पद - स्वामी माझा योगीराजा आवडत...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


स्वामी माझा योगीराजा आवडतो हदयीं ।
दिवसरजनी न गमे जनीं नावडे कांहीं ॥ध्रु.॥
आदिशक्ती परमेश्वर षड्‍गुण ईश्वर ।
त्याचें अंतर परात्पर शुद्ध विचार ।
योगेश्वर अपरांपर तो चि अवतार ।
हीन दीन जना करी पावन माझें माहेर ॥१॥
अध्यात्मखाणी ग्रंथ वाणी वदोन गेली ।
न काळे महिमा न गणे
सीमा काये बोलिली ।
भक्तमंडळी भूमंडळीं कोणें मोजिली ।
उत्तम मूर्ति अपार कीर्ति विश्वीं दुमदुमिली ॥२॥
करुणानिधी करुणाकरें कृपें पाहिलें ।
बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध होऊनी ठेले ।
जडमूढ प्राणी चरणस्पर्शें कल्याण जाले ।
माया ममता विवरुनि पहातां निज पद लाधले ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP