मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
आतां लावा रे पंचारती । रा...

श्री रामाचे पद - आतां लावा रे पंचारती । रा...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


आतां लावा रे पंचारती । रामलक्ष्मणसीतामारुती ॥ध्रु.॥
समदृष्टीनें राम पहा । नीट सन्मुख उभे रहा ।
राम होउनी राम तुम्ही पहा ॥१॥
ध्यान आव्हान आसन जाण । पाद्य अर्घ्य आचमन ।
कांहीं नेणे मी रामाविण ॥२॥
स्नान परिधान उपविती गंध । केशर कस्तुरी सुमन सुगंध ।
कांहीं नेणे मी मतिमंद ॥३॥
धूप दीप नैवेद्य जाण । विडा दक्षिणा नीरांजन ।
कांहीं नेणे मी रामाविण ॥४॥
मंत्रपुष्पादि प्रदक्षण । पंचभूतादि पांच हि प्राण ।
करा रामासी समर्पण ॥५॥
राम लक्ष्मण सीताबाई । नाम कल्याण * नित्य गाई ।
राम व्यापक सर्वा ठाईं ॥६॥

रामीरामदास * म्हणे । रामाविण मी कांहीं नेणे ।
राम माझा जीव प्राण ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP