श्री कल्याण स्तवन - तगतो धणी माझा धणी माझा । ...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
तगतो धणी माझा धणी माझा । कल्यान सद्गुरुराजा ॥ध्रु०॥
श्रमहरणीतिरीं साजे । ज्याची समाधी हो विराजे ॥१॥
ब्रह्मचर्य व्रतधारी । जो कां नि:संग निर्विकारी ॥२॥
निस्पृह महंत विरागी । जो कां संगातीत नि:संगी ॥३॥
रामउपासक ज्ञानी । ज्याचे शतपथ तो गुण वानी ॥४॥
शाम म्हणे मी ज्याचा । चाकर आज्ञाधारक साचा ॥५॥
आलों शरण तुजलागी जिवेंभावें । भवार्णवापासोन सोडवावे ॥१॥
कृपा कीजे कल्याण गुरुराया । वेळोवेळा लागेन तुझ्या पाया ॥ध्रु०॥
करूं नेणे सद्भक्ती तुझी सेवा । परी म्हणवीतो दास गुरुदेवा ॥२॥
शामा म्हणे अपराध माझे कोटी । दयाघना तूं घाली सर्व पोटीं ॥३॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP