श्री कल्याण स्तवन - सद्गुरु माझा कल्याण दीना...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
सद्गुरु माझा कल्याण दीनानाथ । धणीवरी आठऊं रघुनाथ ॥ध्रु०॥
गुरु माझा परब्रह्मवासी । जिवीं माझे जडला अहिर्निशी ॥१॥
गुरु माझा संचला निराकार । ब्रह्मादिका न कळे त्याचा पार ॥२॥
गुरु माझा अनंत अपार । होते जाते माया चराचर ॥३॥
वेदश्रुती न कळे त्याचा अंत । अंतर्बाह्य व्यापक सदोदित ॥४॥
जना म्हणे हे रंक नवाजिलें । मोक्षपदीं नेउनी बैसवीलें ॥५॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP