श्री कल्याण स्तवन - जय जय जी कल्याणा पतीतपावन...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
जय जय जी कल्याणा पतीतपावन जगदोद्धरणा हो ।
गुणमयी सरिता दुर्धर तरलों तरलों संशयहरणा हो ॥ध्रु०॥
निगमागमश्रुतिसारा विमला निर्द्वंदा अविकारा हो ।
षड्गुणवरदाभेदा अद्बय सिंधू हे सुखकारा हो ।
तव स्मरणें षड्वैरीयांचा मोडुनि गेला थारा हो ।
सत् चित् घन अद्वैता नमितां नैश्वर करीसी मारा हो ॥१॥
तव पदकंजस्पर्शे अवघें जीवपण जिवें चि मेलें हो ।
शिवभावा वोलांडुनि निरतेशै अक्षयीं ठेले हो ।
पुनरपि जननामरणामार्गीं काढियलें बिदुलें हो ।
आज्याचें दधी पुन्हां शर्कर युक्षापरी तां केलेम हो ॥२॥
परइच्छे तो तरु जैसा वातस्पर्शे हाले हो ।
आयुष्याच्या योगें तद्वत् सहजें हे तनु चाले हो ।
विस्मरणें करी कर नृत्याते परी ते वाचा बोले हो ।
अगम्य महिमा जगज्जीवन प्रभु भावें धरी पाउलें हो ॥३॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP