श्लोक स्वामीचे - कल्याण नामें अति कीर्ति ज...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
कल्याण नामें अति कीर्ति ज्याची । ऐका लिला पावन हो जयाची ।
सद्भक्तिनें सद्गुरु तोषवीला । सद्भावकीर्तिध्वज ऊभवीला ॥१॥
जुन्नर प्रांतीं असतां मग तेथुनी आले ।
बंधू दोघे चाफळ पाहुनि सुखी जाले ।
माता संगें ऐसीं तीघें जव पाहाती ।
समर्थाला अद्भुत वाटे विश्रांती ॥२॥
देखोनि डोळां हदईं सुखाचा । तो लोटला पूर अपार साचा ।
केला नमस्कार वडील पुत्रें । आनंदली पाहुनि सर्व गात्रें ॥३॥
॥ वेवी ॥
जैसी मारुतीआंगीं गुप्त शक्ती । ते श्रीरामदर्शनें प्रगटे निश्चितीं ।
कीं निशीच्या पोटीं गभस्ती । प्रगटोनी गिळी तमातें ॥४॥
तेवीं दृष्टीं पाहुनी समर्था । अति संतोष आंबाजीपंता ।
हदईं उगऊनि विरक्ती सर्वता । आसक्तिअंधारें दवडिलीं ॥५॥
समर्थासी प्रार्थुनी विनती । सद्भावें केली जोडिले हस्तीं ।
मजला कृपेनें कृपामूर्ती । अनुग्रह केला पाहिजे ॥६॥
ऐकोनी तयाचें वचन । समर्थीं वोळखिलें चिन्ह ।
जेवीं उकरडां सांपडलें रत्न । पारखी म्हणे अमोल्य ॥७॥
मग कृपेनें अनुग्रह केला । तो हदयभुवनीं प्रगटला ।
पडला निघतां देखणी कळा । नेत्रींच जैसी उद्भवे ॥८॥
आरिसा घांसिता साहणेसीं । तेथें चि स्वच्छता प्रगटे जैसी ।
कीं भेटी होता दीपवातीसी । वाती दीप चि होय तो ॥९॥
भक्तीविण कोरडी वाती । लवितां सहज चि विझे पुढती ।
येकीं भिजउनी धरिली हातीं । ते हि विझे क्षणेकां ॥१०॥
येकीं विषय आंथरू ना पुरती । शब्दज्ञान सांजवाती ।
येक झांकाझाकी पुरती । क्रियेची वाती दांभिक ॥११॥
येकीं भक्तितस्नेहें ठवळीं भरली । तें स्वर्गभोग वातें मालवली ।
आस्परा उंदिरीं चाटिली । यापरी विझाली दीपज्योती ॥१२॥
प्रतिष्ठा धनीं वेदशास्त्रदीप । ते विप्र मानहनीस्तव आपेंआप ।
मावळोनी जाले ब्रह्मराक्षसरूप । धन कोळसे प्रतिष्ठा ॥१३॥
येकीं तपोतेजाचा
Last Updated : March 26, 2014
TOP