श्री कल्याणचे पद - अधम जाणावा । तो नर उत्तम ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
अधम जाणावा । तो नर उत्तम न म्हणावा ॥धृ०॥
भंगी चंगी पगडीं बींगी । दारापरधनविषयासंगी ॥१॥
पुत्रसुतावर अर्जी२ तयासी । भूतकृपाशठ गुरुपदद्वेषी ॥२॥
न मनी कीर्तन सज्जननिंदा । लक्षित क्षुद्रें वादविवादा ॥३॥
राजस तामस कर्म३ जयासी । अंतीं रवरव नर्क तयासी ॥४॥
तारक मारक आपली करणी । वचन गीतावर कल्याण वाणी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP