मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
वृषभारूढ जाला । कैलासाहुन...

श्री शंकराचे पद - वृषभारूढ जाला । कैलासाहुन...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


वृषभारूढ जाला । कैलासाहुनी आला ॥१॥
चंद्रमौळी देवाधिदेव चंद्रमौळी ॥ध्रु.॥
गळां रुंडमाळा । ऊर्ध पुंड४ टीळा ॥२॥
चिताभस्म आंगीं । जटाधारी जोगी ॥३॥
त्रिशुळ डमरू धरी । करी खापरी धरी ॥४॥
ग्रंथशोधन करितो । त्रैलोक्या वाटितो ॥५॥
शत कोटींचें बीज । जना सांगे गुज ॥६॥
व्याघ्रांबरधारी । वेष्टिला वीखारी ॥७॥
नामें कल्याण करी । निवाला अंतरीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP