मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
गुरुराज राज राज विराज रे ...

श्री कल्याण स्तवन - गुरुराज राज राज विराज रे ...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

गुरुराज राज राज विराज रे ॥ध्रु०॥

ज्याचेनी सत्य त्रैलोक्य जालें । त्यास मी बोलों काय रे काय रे काय रे ॥१॥
त्रिउभवनपावनी व्यापुनि अनुरणी । श्रुती तूं तटस्त धाय रे धाय रे धाय रे ॥२॥
कल्याणस्वामी ध्यातो अनुदिनीं । दिगंबर शरण जाय रे जाय रे जाय रे ॥३॥

सद्‍गुरु वर्णवेना । ज्याचा पार चि न कळे कोणा ॥ध्रु०॥
सा अठरा आणि चार । तेही न कळे त्याचा पार ॥१॥
जो काम अनंत अपार । स्वामी निर्गुण निर्विकार ॥२॥
धर्मस्थापनेकारणें । जेही अवतार चि घेणें ॥३॥
रामदासांचिये वंशीं । स्वामी कल्याण अहिर्निशीं ॥४॥
वृत्ति निवृत्ति निमाली जेथें । जाला नरहरी तल्लीन तेथें ॥५॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP