मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
काया वाचा सप्रेम मनोभावें...

श्लोक स्वामीचे - काया वाचा सप्रेम मनोभावें...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

काया वाचा सप्रेम मनोभावें रे ।
सद्‍गुरुसी शरन वेगीं जावें रे ॥ध्रु०॥

ज्याच्या पाईं अन्मत तीर्थां वास रे ।
त्याच्या तीर्थें जाती महा दोष रे ॥१॥

ज्याच्या हातें हातासी देव येतो रे ।
देही असतां विदेही पूर्ण होतो रे ॥२॥

ज्याच्या बोधें खुंटती दृश्य भेद रे ।
सबाह्य अंतरीं कोंदाटे ब्रह्मानंद१ रे ॥३॥

कृपा करूनी निर्वाणपदा नेती रे ।
साम्राज्य कल्याण सुख देती रे  ॥४॥

शिरीं ठेउनि पद्महस्त । माझें अंतर केलें स्वस्त ॥१॥
त्याचें नाम मुखासी आलें । तेणें कल्याण माझें जालें ॥ध्रु०॥
ज्याच्या बोलें बोल निमाला । मीतूंपणासी पडिला घाला ॥२॥
ज्याच्या कृपाविलोकनें पाहो । भवबंधन जालें वाव ॥३॥
ज्याचे वंदितां पाये माथा । पूर्ण साम्राज्य आलें हाता ॥४॥

रे नर सदा मानसीं जपे तूं कल्याण । तेणें होईल तुझें कल्याण ॥१॥
ज्याचा निवास श्रमहरणीतीर । सकल विश्रांतीचें माहेर ॥२॥
ऐसा श्री सद्‍गुरु योगीराज । सख्या जिवासी देई सामराज ॥३॥

धन्य तो साधु जाणा । कल्याण योगीराणा ॥ध्रु०॥

ज्याच्या चरणाची ऐसी ख्याती । जे शरण जाती ।
ते ते साधक सिद्ध होती । हे पावन कीर्ती ।
महिमा वर्णूं मी किती । श्रुती नेति नेति म्हणती ॥१॥

माथा ठेउनी मोक्षपाणी । गुज सांगोनी कानीं ।
लावी१ सस्वरूप निज ध्यानीं । निज दाउनी नयनीं ।
सामराज कल्याण दानी । भक्तासी जो निदानी ॥२॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP