श्री दत्तात्रेयाचे पद - अत्रीनंदन वंदन जगत्रई । अ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


दत्त भिक्षाहारी
अत्रीनंदन वंदन जगत्रई । अनाथ दीन तारी ॥१॥
दत्त भिक्षाहारी ॥ध्रु.॥

सुंदर कांती सतेज मनोहर । दिगंबर वपु धारी ॥२॥
सिद्ध१ सनातन पूर्णावतारी । विधि हरि त्रिपुरारी ॥३॥
नित्य निरंतर भागीरथी तट । नित्य नेम सारी ॥४॥
करवीर क्षेत्र मधुकर वृत्ती । योगलीळा भारी ॥५॥
अनेक पंथ ध्याति पुरातन । राहे गिरीवरी ॥६॥
श्री गुरुराज कृपाघनमूर्ती । कल्याण सुखकारी ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-03-23T05:25:40.0730000