मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
कृपासिंधु सद्‍गुरुराजमूर्...

श्री गुरूचे पद - कृपासिंधु सद्‍गुरुराजमूर्...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


कृपासिंधु सद्‍गुरुराजमूर्ती । तुझा पार न कळे वेदश्रुती ।
बोलों जातां म्हणती नेति नेती । तुझ्या ध्यासें अनंत सिद्ध होती ॥१॥
जय रामा आराम निजधामा । हरादिक चिंतिती तुज रामा ।
ब्रह्मानंदें डुल्लती अंतर्यामा । काये जाणे मानव तुझी सीमा ॥२॥
दिनानाथ हें थोर ब्रीद गाजे । तेणें मानसीं परम सुख माजे ।
गुरुस्वामी पातले हदयसेजे । नाम कल्याण घोष टाळी वाजे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP