श्री रामाचे पद - ज्याचे चरणींचें पाणी । मा...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


ज्याचे चरणींचें पाणी । माथा वंदी शूळपाणी ॥१॥
तो चि देव आठवावा । ह्लदयांत सांठवावा ॥ध्रु.॥
ज्याचे चरणींची माती । चिरंजीव तो मारुती ॥२॥
ज्याचे५ चरणाची ख्याती । सिंधु पाषाण तरती ॥३॥
चरण६ वंदितां चि शिरीं । विभीषण राज्य करी ॥४॥
चरण वंदितां चि माथां । दिव्यदेही गौतमकांता९ ॥५॥
ज्याचें चरणप्रसादें । स्थिरावलीं इंद्रपदें ॥६॥
ज्याचे आठवितां पाय । सिद्ध कल्याणउपाय ॥७॥

N/A


References : N/A
Last Updated : 2014-03-22T07:06:27.5270000