श्री रामाचे पद - सुंदर सुंदर रुज साजे । सी...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
सुंदर सुंदर रुज साजे । सीतावर वर वीराजे ।
अठरा पद्में कपिराजे । भुभुकारें नम गाजे ॥१॥
जय जय जय जय श्रीरामा । शंकरमानसविश्रामा ।
सर्वापर तूं परमात्मा । विश्र्वीं व्यापक विश्वात्मा ॥ध्रु.॥
प्रतापविजयी रघुराजा । मोचन सुरवर सुरफौजा ।
वोळगती राजाधिराजा । रंक मी म्हणवीती निज काजा ॥२॥
अहं रावण मारुनियां । भाव बिभीषण स्थापुनियां ।
वानरगण रण उठउनियां । कल्याणदायक म्हणउनियां ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP