मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
राजीवलोचन बंदविमोचन । नाम...

श्री रामाचे पद - राजीवलोचन बंदविमोचन । नाम...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


राजीवलोचन बंदविमोचन । नाम तुझें दिनबंधू ।
गणिका अजामेळ पापिणी कुंटणी । उतरवी भवसिंधू ।
अंध मुकें दीन दरिद्रदोषी । ऐसियातें नाम छंदू ।
ब्रीदासाठीम भक्त तारिले अनंत । गुण नाती संतसाधू । रे रामा ॥१॥

रामा कृपाळुवा दयानिधी । कृपाळुवा ॥धृ.॥

ऋषिश्रापें वर पावली सत्वर । उद्धरिले अहिल्येसी ।
पादप पाषाण तृण भूमीवरी । आलिंगीसी प्रेमरासी ।
भिलटीचीं फळें सेविलीं निर्मळ । भाविकें प्रेमळें निववीसी२ ।
कबंध विराध शरें मुक्त केले । खग मृग वनवासी ॥२॥
वदे सीता सीता, काननीं हिंडतां । पार्वती तत्त्वता छेळूं आली ।
देव परात्पर नित्य निरंतर । जाणतो अंतर चंद्रमौळी ।
जगद्रुरुवर सुंदर श्रीवर । साक्षी चराचर वनमाळी ।
ब्रह्मस्थिती आगमनिगम । वेढावली बहु काळीं ॥३॥
पवित्र करणी पवित्र धरणी । पवित्र वर्णीं नाम तुझें ।
पवित्र परिकर वौंश दिवाकर । सांगतो शंकर विश्वबिजे ।
रिपुवरखंडण दानवदंडण । सुरवरमंडण राम राजे ।
सज्जनभुवन कल्याण जीवन । पतीतपावन ब्रीद गाजे । रामा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP