मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
वानरकुळविभूषित दिनमणी । क...

श्री मारूतीचे पद - वानरकुळविभूषित दिनमणी । क...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


वानरकुळविभूषित दिनमणी । केवळ त्रिपुरारी ॥१॥
रुद्र पूर्णावतारी ॥ध्रु.॥
पूर्ण जळाब्धो लंघुनि सत्वर । पहात त्रिकुटगिरी ॥२॥
जनकनंदिनी शोधुनि बोधिली । वंदुनि पाय शिरीं ॥३॥
समुळ काननीं निर्मुळ ते क्षणीं । आक्षै सुत मारी ॥४॥
मारुनि राक्षसराज विटंबुनी । जाळित हेमपुरी ॥५॥
मुख्य प्राणनाथ स्वामी कृपावर । सुंदर मदनारी ॥६॥
द्रोण गिरीवर आणुनि मृत्यवीर । सौमित्रसुख भारी ॥७॥
प्राणसंकट रक्षुनि रघुपति । आनंद सुखकारी ॥८॥
सुंदर ध्यान मनोहर मूर्ती । भाविक जन तारी ॥९॥
निरउनि राघव रामउपासक । वंदित वाक्य शिरीं ॥१०॥
कल्याण कृपा वर पूर्ण पुरातन । हीनदीनकैवारी ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP