श्री रामाचे पद - राघवरायासम तुल्य देव नाही...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
राघवरायासम तुल्य देव नाहीं भुवनत्रै ॥धृ.॥
तंदुळ पोहे मुष्टि दोनी ।
घेउनि सुदामयालागुनि ।
नगरी दिधली म्हणती जनीं ।
विशेष करणी कैसी हे ॥१॥
ऋषिवर छळितां पांडवराणी ।
धांवे ऐकत धांवा कर्णीं ।
करतळ पसरुन म्हणे बहीणी ।
घाली शेष शाकेचें ॥२॥
त्रिपांड भुमिका घेउनि वामन ।
वाढे अद्भुत जिंकी त्रिभुवन ।
सुतळ राज्य बळीस देऊन ।
रक्षण तिष्ठत दारेसी ॥३॥
घेउनि देती उदंड देव ।
तैसा नव्हे राघवराव ।
नमनासाठीं बिभिषणभाव ।
ज्याने१ दिधलें राज्याते ॥४॥
ज्याच्या नामें पर्वत तरती ।
जड जीव कल्याणीं रातती ।
ज्याची कीर्ति शिवादि गाती ।
रामीं भजती निजनिष्ठा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP