मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
पिंगाक्षीवदना मदनाअंतक तू...

श्री मारूतीचे पद - पिंगाक्षीवदना मदनाअंतक तू...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


पिंगाक्षीवदना मदनाअंतक तूं गुणसदना ।
रजनीचरवरकदना अत्यंत प्रिय मधुसूदना ॥१॥
हरिवरनंदन पवना । कडकड जाळित भुवना ।
फणीवरजीवनजिवना । जगदांतर जगजीवना ॥२॥
वृत्रारिरिपुहरणा । जमदाग्री जितचरणा ।
तन्मय अंत:कर्णा । भरणामरणातरणा ॥३॥
गिरिवर उचलुनि बोटी । लंघुनि च्यारी कोटी ।
उठवित कपिकुळकोटी । कैवारी सुरकोटी ॥४॥
कृपासहस्रकरउदया । करुणाजळधरहदया ।
कल्याणदायक सदया । मारी दुर्जन अदया ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP