मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
माधव तारी भाविकासी ॥धृ०॥ ...

श्री गुरूचे पद - माधव तारी भाविकासी ॥धृ०॥ ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


माधव तारी भाविकासी ॥धृ०॥
अजामेळ अनुतापी । नारायण नामोच्चारी ।
निजपुत्रा पढवी हरी । आरुढ विमाना परिवारीं ॥१॥
पापिणी कुंटिणी शुका । रघुपती पाचारी ।
बैसोनि पुष्पकांतरीं । दीनबंधु दीन अंगिकारी ॥२॥
वेश्या पिंगळा नारी । विरक्त विषयावरी ।
चढोनी वैकुंठगिरी । रविसुतदुत१ मारामारी ॥३॥
कलियुगीं संतमुनी । ब्रह्मनिष्ठ भजनांतरीं ।
अनुदिनीं कीर्तनगजरीं । हरिहर भासे जगदाकारी२ ॥४॥
गुरुकृपा वरद ज्यासी । भजनें कल्याण करी ।
नवविधा दुभतें घरीं । भयातीत निर्भय भिक्षाहारी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP