श्री रामाचे पद - या रामचंद्रीं मानस वेधलेस...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
या रामचंद्रीं मानस वेधलेसें ॥ध्रु.॥
सुंदर सुंदर लावण्यमनोहर । राजाराम शोभतसे ॥१॥
धनुष्यबाण करीं ठाण निरंतरीम । जेथें तेथें दिसतसे ॥२॥
त्रिंबकभंजन मुनिजनरंजन । महादेव ध्यातसे ॥३॥
नित्य निरंतरीं ध्यान हें अंतरीं । दासां कल्याण होतसे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP