मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
अनाथबंधू करुणासिंधू । उतर...

श्री रामाचे पद - अनाथबंधू करुणासिंधू । उतर...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


अनाथबंधू करुणासिंधू । उतरवी भवसिंधू ॥१॥
अहो जयरामा ॥ध्रु.॥
मेघशामा उत्तमोत्तमा ॥ तारी तारी आम्हां ॥२॥
दुर्घट वाटे अंतरीं दाटे । काय करूं राघवा ॥३॥
मायाजाळ हा भवव्याळ । डंखूं पाहे आम्हां ॥४॥
मनाच्या कामना अनंत भावना । निरसी तूं मेघशामा ॥५॥
नाम कल्याण म्हणोनि शरण । देई चौथी भक्ति रे रामा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP