मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
घडी घडी घडी घडी आठवतें रू...

श्री रामाचे पद - घडी घडी घडी घडी आठवतें रू...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


घडी घडी घडी घडी आठवतें रूप तुझें रामा ।
जप जप जप जप नाम नित्य नेम प्रेमा ॥ध्रु.॥
झळ झळ झळ कीरटी कुंडल सरळ कुरुळ साजे ।
कोटी इंदू पूर्ण कळा मुख पद्मीं लाजे ॥१॥
मग मग मग टिळक भाळीं सुरेख मृग नाभा ।
झग झग झग दंतप्रभा कोटी सूर्य गाभा ॥२॥
घण घण घण च्यापघंटा लख लख लख तूणी ।
सर्व काळ भक्तपाळ शोभे सिंव्हासनीं ॥३॥
कंठमाळ रत्नमाळ पदक डोलतसे ।
तग तग तग तगीत पीत अंबर कासे ॥४॥
खळ खळ खळ आंदु वाकी शब्द नेपूराचे ।
ब्रह्मादिका दुर्लभ पदें, हदय कल्याणाचें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP