मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
मुनिवरमंडण अरिवीरखंडण । द...

श्री रामाचे पद - मुनिवरमंडण अरिवीरखंडण । द...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


मुनिवरमंडण अरिवीरखंडण । दंडण दानव रे ॥१॥
राम माझा पतीतपावन रे ॥ध्रु.॥
काग भृशंडी, मुरडुनी मुंडी । शोभात दशरथभूवन रे ॥२॥
कौशिकवंदन१ ताटिकाछेदन । पाहोनि घोर वन रे ॥३॥
पतिव्रता पुण्यशिळा, गौतमशापें शिळा । उद्धरिली चरण लाउनि रे ॥४॥
सैवर साधुन, सुरवरबंधन । ऐकात धावन रे ॥५॥
चित्रकूटपर्वतीं, काग पीडी युवती । येतां शरण कृपाजीवन२ रे ॥६॥
द्विजकष्टवारण, दुष्टसंव्हारण । निर्मुळ दंडवन रे ॥७॥
भिलटी उद्धरी, घेउनि बदरी । उचिष्ट करी सेवन रे ॥८॥
वाळीनिग्रहणा, सुग्रीवरक्षण । तारेचें शांतवन रे ॥९॥
सीताशोधन हरी, रावणमुगुट हारी । पाडुनी दहन भूवन रे ॥१०॥
रावण मर्दुनि बाणीं, विबूध गर्जति वाणी । आनंदलें त्रिभुवन रे ॥११॥
अयोध्येसी सुख पूर्ण, ब्रह्मानंद परिपूर्ण । जन आत्मनिवेदन रे ॥१२॥
वरद बिभीषण मारुति कल्याणघन । सुखरूप जनवन रे ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP