मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
रे सज्जना ऐके तूं माझया म...

श्री गुरूचे पद - रे सज्जना ऐके तूं माझया म...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


रे सज्जना ऐके तूं माझया मना । दत्त मचिंद्र गोरक्षी जाणा ।
व्यास वसिष्ठ जय मुनिराणा । गुरुकृपे पावले निरंजना ॥धृ०॥
ब्रह्मादिकां दुल्लभ रामपाये । तेथें मानवी बापुडे केवी जाये६ ।
मत्तामत्ता विरोध वाद पाहे । शास्त्रें भांडतीं न पडे ठायीं सोये ॥१॥
गुरुकृपा वरदवर ज्यासी । रामपदीं मिळणी सीघ्र त्यासी ।
सिद्धसामर्थ्य कोण पुसे यासी । गुरुकृपे अगम्य पुण्यरासी ॥२॥
बरें शोभिलें आगमनिगमाला । जिवा शिवा संगम१ उगमाला ।
माया अविद्या गलबला निर्ममला११ । विनवी कल्याण सज्जनसुगमाला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP