मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
सुखरूप जालों स्वामी तुमची...

श्री गुरूचे पद - सुखरूप जालों स्वामी तुमची...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


सुखरूप जालों स्वामी तुमचीया पादसेवे ।
कल्याण माझें जालें रंगलों सोहंभावें ॥ध्रु.॥

चित्त हे वृत्ती माझी चैतन्यीं मुराली ।
संतोषें स्वात्मसुखी अनुभव किल्ली दिली ।
निर्विकल्प वास जाला अनुभव केवळ१ बोली ।
विश्व हें नाहीं अवघे श्रीराम स्वरूपीं पाही ॥१॥
पावलों धांवलों देवा तुमचीया सेवाबळें ।
वेदांतश्रुती ज्यासी निर्विकल्प बोलती बोलें ।
ते मी स्वयंभ जालों हे शब्द मावळले ।
मीपण तूंपण अवघे स्वामी गिळुनी उगळे ठेले ॥२॥
रामावीण वृत्ती माझी आणिक न जाय कोठें ।
जिकडे पाहे तिकडे श्रीराम माझा भेटे ।
कल्याण म्हणे सकळ द्वैतपण जेथें आटे ।
रामदासस्वामी जईं आनंदुघन भेटे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP