श्री मारूतीचे पद - सुंदर रे भीमा, श्रीरामा द...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
सुंदर रे भीमा, श्रीरामा दाखवी झडकरी ।
प्रताप आपुला प्रगट करी ॥ध्रु.॥
करुणा भाकिती हरी । पडिलों तमसागरीं९ ।
चिंतार्णवीं तारी तारी तारी ॥१॥
जुत्पती बोलती वाचा । आत्मा भेटवी आमुचा ।
जीव हा व्याकुळ सकळिकांचा ॥२॥
अद्भूत आवेश आला । कपिवीर सिद्ध जाला ।
अभय कल्याण वदता जाला ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 03, 2017
TOP