मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
बाईये गे मजला वेधु लागला ...

श्री गुरूचे पद - बाईये गे मजला वेधु लागला ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


बाईये गे मजला वेधु लागला सज्जनाचा ।
विजय जहाला या सुमनाचा ॥ध्रु.॥
ज्याचे कीर्तीचा ठसा । महिमा वर्णूं मी कैसा ।
तीर्थें वंदिती चरणशेषा ॥१॥
त्याच्या चरणाची माती । वंदिन मी दोहीं हातीं ।
मग मी पावन निजपदप्राप्ती ॥२॥
त्यांच्या६ दासांची दासी । होईन मी त्यांची दासी ।
पतीतपावन भवभय नासी ॥३॥
कृपा कल्याण ज्याची । चुकवी संसारचीची ।
वारी बोहरी या जन्माची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP