श्री कल्याण स्तवन - काकड आरति श्रीगुरु कल्याण...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
काकड आरति श्रीगुरु कल्याणस्वामी ।
जिवेंभावें वोवाळितां प्रगटसि अंतर्यामीं ॥ध्रु०॥
ज्ञान अज्ञान वळुनी भ्रांती घृतें तिंबिला ।
स्वात्मबोध प्रगटला तेणें जळोनी गेला ॥१॥
अनंत अपार नाहीं पार तुझ्या स्वरूपाचा ।
स्वामी कल्याण दास रामदासाचा ॥२॥
अंतर्बाह्य व्यापुनि स्वरुपीं रहिवास ।
निशिदिनीं तुझे स्वरूपीं बाळकरामाचा दास ॥३॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP