श्री कल्याण स्तवन - कल्याण भज मना तूं नित्य र...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
कल्याण भज मना तूं नित्य रे । सर्व सांडि हे अनित्य रे ॥धुर०॥
कल्याण स्वस्वरुप जाणिजे । सदा तदृप च होइजे ।
ब्रह्माहमस्मि असे वर्णिजे । गुरुमुखें अकर्णिजे ॥१॥
जन्मासी येउनि केलें काय रे । व्यर्थ शिणविली माय रे ।
परमार्थे धरी गुरुपाय रे । वेदें दाविला उपाय रे ॥२॥
रामदासदास्य पूर्ण जाहलें । अलभ्य रुप लाधलें ।
निरंजनीं निरंजन शोभलें । द्वैत असतां चि नाडळे ॥३॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP