मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
राघव गावा गाईला चि ॥ध्रु....

श्री रामाचे पद - राघव गावा गाईला चि ॥ध्रु....

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


राघव गावा गाईला चि ॥ध्रु.॥
चकोरा आवडे जीवा । चंद्रामृत निज ठेवा ।
अखंड सातव्या आठव्या । दिनबंधू ध्याइला चि ध्यावा ॥१॥
चातका लागला हेवा । घनानंद भेटवा ।
अनुदिनीं करिती धांवा । वानिला चि वानूं नित्य नवा ॥२॥
भावार्थ बळकट व्हावा । स्मरणें कल्याण जीवा ।
येथें कांहीं नाही गोवा । नामामृत सेविलें चि सेवा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP