मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
ब्रह्म वैराग्य लक्षण । सि...

श्री गुरूचे पद - ब्रह्म वैराग्य लक्षण । सि...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


ब्रह्म वैराग्य लक्षण । सिद्ध साधका कथन ।
किती बोलती ते जन । आम्ही बैरागी ॥१॥
॥ गुरु सेवी कां रे रे ॥धृ०॥
गुरु सेवी कां सत्वर । झणी लविसी उशीर ।
गुरुभजन प्रकार । आहे सर्व हि सिद्धी ॥छ॥
नाहीं मत्स्यासि भक्षिलें । मद्या नाहीं जो प्राशिले
कन्ये नसतां भोगिलें  । वेश्ये आलिंगन ॥२॥
माता नाहीं वधियेली । गौ नाहीं भक्षियेली ।
तेहीं डोई जे मुंडिली । नव्हे योगेश्वर ॥३॥
योगाभ्यासाचें लक्षण । हे जो नाहीं पै साधन ।
तेहीं वेर्थ चि बोलणें । आम्ही वैरागी ॥४॥
नव्हे इतुकें साधन । असो येक तर्‍हीं चिन्ह ।
तया किंचित बोलणें । शोभे वैरागी ॥५॥
नाहीं येक हि ज्या योग । तैं तो सहज चि अभाग्य ।
त्याचें स्मशानवैराग्य । शब्द लोकोत्तर ॥६॥
आत्मनिष्ठा लोकोत्तर । साध्य साधावें सत्वर ।
मग बोलावें उत्तर । शोभे वैरागी ॥७॥
नव्हे सत्संगावांचून । श्रीगुरुचें दर्शन ।
गुरुवांचुनी साधन । नव्हे कल्याण ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP