मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
तुम्ही श्रोते जी महाराजमू...

श्री कल्याणचे पद - तुम्ही श्रोते जी महाराजमू...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


तुम्ही श्रोते जी महाराजमूर्ती । तेथें माझी जी वित्पत्ती किती ।
काय गावें हे आठवेना चित्तीं । बुद्धिहीण मी महा मूढमती ॥१॥
व्याघ्रसिंह्याचे जनीं भय मोठें । परी तयाचीं पिलीं नेटपाटें ।
तयापुढे खेळती येक वाटे । मायबापाअंतरीं मोह दाटे ॥२॥
प्रभू बोबडे बोल विवरावे । माझे दोष जी गुण न मानावे ।
तुम्हां कल्याण चिंतितो भावें । माझ्या स्वामीचे शब्द परिसावे ॥३॥


Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP