श्री गुरूचे पद - रामनामाचा कडकडाट । भवसिंध...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
रामनामाचा कडकडाट । भवसिंधूस । भवसिंधूस पायवाट ।
पायरी करून वैकुंठ । होती प्रविष्ट परब्रह्मीं ॥१॥
रामनामांकित नर । बुडऊं न शके भवसागर ।
श्रीराममुद्रांकित मी वानर । सुखें परपार पावलों ॥२॥
नित्य श्रीरामनामस्मरण । तेथें वीर्य धैर्य कल्याण ।
ब्रह्म पावती सनातन । हें महिमान स्मरणाचें ॥३॥
जेथें श्रीरामविस्मरण । तेथें अकीर्ति अपेश अकल्याण ।
अति निंद्यत्वें पापी पूर्ण । अध: पतन पहा नरकीं ॥४॥
यालागी साक्षपें आपण । समूळ सांडावें विस्मरण ।
नित्य करितां श्रीरामस्मरण । कीर्ति कल्याण निज विजयी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP