मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
प्रताप वदला रे वदला न वचे...

श्री मारूतीचे पद - प्रताप वदला रे वदला न वचे...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


प्रताप वदला रे वदला न वचे कोणा ॥ध्रु.॥
राघवशुद्धि जाउनि बुद्धि मगरीसुतवरदानी ।
राक्षस मारुनि दश्विनिधि लंघुनि महिकावतिये सदनीं ॥१॥
नाटकरूपी शक्तिस्वरूपी । आपण चि होउनि ठेला ।
गोंधळ घालुन राघव आणुन । बंद विमोचन६ केला ॥२॥
महिविर मर्दुनि भोपा रगडुनि चरणीं पीठ९ चि केला ।
तडफड तडफड राक्षसमेळा१० । नगरलोक हडबडिला ॥१३॥
लत्ताप्रहरें कपाट फोडुनि बाहेरी राम विराजे ।
पळा रे पळा हनुमान आला अद्‍भुत बोंब गाजे ॥४॥
राक्षसवरदी शोधुनि हरदी अरिकुळ मारित आला ।
अहिरावण तो बाणीं जाळुनि राघव विजयी जाला ॥५॥
अहिमहि मारुनि५ वानर घेउनि मारुति रघुपति आले ।
बिभिषण सुग्रिव तल्लीन होउनि कल्याण प्रेमें भरले ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP